लोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी

104

लोणावळा, दि. १८ (पीसीबी) – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर भरधाव कंटेनरची तीन वाहनांना धडक बसली. या अपघातात एक चालक जखमी झाला आहे. हा अपघात आज (शनिवारी) सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.