लोणावळा येथे मराठा आंदोलकांचा रेले रोको

64

लोणावळा, दि. ९ (पीसीबी) – सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) लोणावळा येथे रेले रोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.  

लोणावळा येथील शिवाजी महाराज चौक ते पुणे- मुंबई महामार्ग गवळीवाडा नाका दरम्यान पायी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानंतर लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला.