लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

63

 

मुंबई , दि.२३ (पीसीबी)- महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ७४ होती. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत १५ रुग्ण वाढल्याने ही संख्या ८९ वर पोहचली आहे.

रुग्णसंख्या वाढली आहे मात्र लोकांनी काळजी करु नये. शक्यतो घरी रहावे, घराबाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी अशी विनंती आणि आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकलसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, लोकांनी ३१ मार्च पर्यंत संयम पाळावा. आज जे अनावश्यक कारणाने मुंबईत जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असाही इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.