लोकांना माझ्यामध्ये गोपीनाथ मुंडेंची छबी दिसते – धनंजय मुंडे

158

बीड, दि. १५ (पीसीबी) – लोकांना माझ्यामध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची छबी दिसते, ते माझ्याकडे साहेबांसारखे जॅकेटही घालत जा, अशी प्रेमळ इच्छा व्यक्त करतात, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील दहिवडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

दहिवडीमधील महिलांनी दिलेल्या भेटीमुळे मी भारावून गेलो. या प्रेमाची उतराई माझ्या चांगल्या कामातून करून देईल. माझ्यात त्यांना स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांची छबी दिसत असल्याची प्रशंसा केली. साहेबांसारखे जॅकेटही घालत जा अशी प्रेमळ इच्छा व्यक्त केली. तुमचे प्रेम हा माझा दागिना आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या निमित्ताने गावकरी आणि भाविकांशी संवाद साधला. गावातल्या मंदिरासाठी, तिथल्या उपक्रमासाठी मी नक्की योगदान देईन, असे मुंडे यांनी ट्‌विट करून म्हटले आहे.