लोकहितार्थ प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच अश्वासन

141

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) – झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच सासवड नगरपालिकेच्या हद्दीतील वेताळनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केल्याशिवाय वेताळनगर झोपडपट्टी पाडू नये, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संजय जगताप यांना सांगितले .

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.

यावेळी गणेश लांडगे , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहंमद शेख , महिलाध्यक्षा सुरेखा भालेराव , पथारी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष प्रदीप पवार , सतीश कांबळे , महादेव मोरे , सूर्यकांत संकपाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsAppShare