लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, उदयनराजे, सुनिल तटकरेंना उमेदवारी; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर  

77

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज (गुरूवार)   जाहीर करण्यात आली. ही पहिली यादी असून उर्वरित यादी शुक्रवारी आणि शनिवारी घोषित करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काही जागा बदलण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १  अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पहिल्या यादीतील उमेदवारांची नांवे आणि मतदारसंघ –

ईशान्य मुंबई  – संजय दीना पाटील

बारामती – सुप्रिया सुळे

बुलडाणा – राजेंद्र शिंगणे

सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले

कोल्हापूर – धनंजय महाडिक

जळगाव – गुलाबराव देवकर

रायगड- सुनील तटकरे

ठाणे – आनंद परांजपे

परभणी –  राजेश विटेकर

कल्याण – बाबाजी पाटील

लक्षद्वीप – मोहम्मद फैजल