लोकसभेच्या युतीसाठीचा फॉर्म्युला शिवसेना स्वीकारणार, या सगळ्या पेरलेल्या बातम्या- संजय राऊत

77

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या भेटीत २०१४ च्या लोकसभेच्या युतीसाठीचा फॉर्म्युला शिवसेनेने स्वीकारलाय, किंवा तेलगु देसमची मंत्रिपद सेना स्वीकारणार या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत, असे  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

२०१६ मध्येच शिवसेनेने कुणाशीही युती करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले.

ज्याप्रमाणे अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले, तसेच इतरही राष्ट्रीय पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनाही आम्ही वेळ देणार असल्याचे राऊतांनी सांगितले.