लोकसभा पुन्हा जिंकण्यासाठी भाजपकडून ९० हजार बूथप्रमुखांना ‘मोदी किट’

34

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्याचा विडा उचललेल्या भाजपने राज्यभरातील आपल्या जवळपास ९० हजार बूथप्रमुखांसाठी टी-शर्ट, टोपीपासून ते अगदी उन्हातान्हात प्रचार करून घाम आल्यावर प्रसन्न वाटावे म्हणून सुवासिक सेंटची कुपी अशा वस्तूंचा समावेश असलेले ‘मोदी-किट’ दिले असून त्यातील जवळपास प्रत्येक वस्तूवर नरेंद्र मोदी यांची छबी झळकत आहे.