लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे आणण्यास सुरूवात; लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही होण्याची शक्यता

66

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अनुक्रमे ८ आणि १३ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाने आत्ताच तयारी सुरू केली आहे. खरेतर मतदान यंत्रे निवडणुकीच्या चार ते सहा महिने आधीच इतर जिल्हे अथवा राज्यातून त्या-त्या जिल्ह्यात आणली जात असताना राज्यातील अनेक जिल्ह्यात आताच मतदान यंत्र आणली जात आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषक, राजकारण्यांकडून सुरू असलेल्या मुदतपूर्व निवडणुकांच्या चर्चेला काही प्रमाणात निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेच्या लगबगीमुळे पुष्टी मिळत असल्याचे बोलले जात आहे.