लोकशाहिसाठी लढा देणाऱ्यांचा आणिबाणी सन्मान अखेर बंद

1

मुंबई, दि. २ (पीसीबी) – राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आघाडी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आणिबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणून देण्यात येणारे प्रतिमहा १० हजार रुपयेचा सन्मान निधी आता बंद कऱण्यात आला आहे. त्या संदर्भातील शासन आदेश शनिवारी (३१जून) काढण्यात आला.

राज्यात यापूर्वी भाजपचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणिबाणीच्या लढ्यात सहभागी व्यक्तींना महिना १० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे लोकशाही रक्षणासाठी इंदिरा गांधी यांच्या विरोधात ज्यांनी रस्त्यावर उतरून आवाज दिला त्यांना दिलासा मिळाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडी सरकारने तो बंद केला. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याचा परिणाम महसुलात घट होवून राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्यावर उपाय म्हणून आता ही सन्माण योजना बंद करत असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

WhatsAppShare