लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दैनिक केसरीच्या कार्यालयात लोकमान्यांना अभिवादन

156

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे व भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बुधवारी (दि. १) दैनिक केसरीच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि  केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक केसरीच्या पिंपरी चिंचवड विभागीय कार्यालयात टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधीपक्ष नेते दत्ता साने, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष  अशोक मोरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, अशोक मंगल, भाजपच्या कार्यकर्त्या सरोजिनी पांडे, जनार्दन पायगुडे, वरिष्ठ पत्रकार विनोद पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. दैनिक केसरीचे मुख्य वार्ताहर आणि पिंपरी कार्यालय प्रमुख विजय भोसले यांनी आभार मानले.