‘लोकप्रतिनिधींनी नागरीकांच्या सुख-दुखात सहभागी व्हावे’- आमदार महेश लांडगे

61

– ‘ॲड. नितीन लांडगे हे राजकारणात समाज कार्यासाठी आलेले व्यक्ती’- आमदार महेश लांडगे

– भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने कलाकारांना, सफाई कर्मचा-यांना मदतीचा हात

पिंपरी, दि.27(पीसीबी) लोकप्रतिनिधी हा विकास कामाबरोबरच नागरीकांच्या सुखा – दुखातही सहभागी झाला पाहिजे. आमचे गुरु माजी आमदार व शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे साहेब यांचा समाज कार्याचा वसा पुढे चालविणारे ‘ॲड. नितीन लांडगे हे राजकारणात समाज कार्यासाठी आलेला व्यक्ती अशी शहरभर त्यांची ओळख आहे.’ ॲड. नितीन लांडगे सर्व कलाकारांना, सहकलाकारांना, तत्रज्ञांना, सहाय्यकांना, सफाई कर्मचा-यांना आपल्या कुटूंबातील सदस्य समजून कोरोनाच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे आले आहेत. प्रत्येकी पाच लाखांचा वीमा, किराणा मालाचे किट, सफाई कर्मचा-यांना रेनकोट त्यांनी भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून दिले आहेत. चिपळूण, रत्नागिरी मधिल पुरग्रस्तांना दोन लाखांची मदत आणि तेथे जाणा-या सेवा पथकाला अकरा हजार रुपये मदत दिली आहे. याचा इतर लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा. असे पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले.

भोसरी कला, क्रीडा रंगमंचच्या माध्यमातून शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना, सहकलाकारांना, तंत्रज्ञांना किराणा किट आणि वीमा पॉलिसीचे वाटप, भोसरीतील सफाई कर्मचा-यांना रेनकोट वाटप, दिघी रोड, गणेश मंदिर येथे मंगळवारी (दि. 27 जुलै) आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस विजय फुगे, राजशेखर डोळस, निवृत्ती फुगे, प्रा. सतिश फुगे, प्रकाश डोळस, राजेश टाकळकर, निवृत्ती लांडगे, नंदू लोंढे, संजय पटणी, विजय उलपे, शारदा मुंडे, मृणाल कुलकर्णी, साधना मेश्राम, पी. चंद्रा, गोविंद गाडे, चंद्रकांत नगरकर, महंमद रफी शेख आदींसह शहरातील कलाकार आणि भोसरीतील सफाई कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.

आमदार लांडगे पुढे म्हणाले की, 2007 पासून भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना, खेळाडूंना व्यासपिठ आणि संधी मिळवून देण्यासाठी ॲड. नितीन लांडगे आणि सहकारी गणेशउत्सव काळात महोत्सव भरवतात. परंतू कोरोनामुळे मागिल दोन वर्षांपासून महोत्सव झाला नाही. या काळात सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागला. त्यातील अनेक समाज घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने ॲड. नितीन लांडगे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असेही आमदार लांडगे म्हणाले.

आयोजक व स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वच समाज घटकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आम्ही भोसरी कला, क्रीडा मंचच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत करण्याचे काम सामाजिक कर्तव्य म्हणून करीत आहोत. आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत चिपळूण, रत्नागिरी येथिल पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गरजू कुटूंबांना मदत करण्यासाठी ठराव पास केला होता. परंतू शासकीय उदासिनतेमुळे ते शक्य झाले नाही. आगामी काळातही मदतीसाठी आणखी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करु असेही ॲड. लांडगे म्हणाले. शारदा मुंडे, विजय उलपे, मृणाल कुलकर्णी, प्रा. सतिश फुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक विजय फुगे, सुत्रसंचालन प्रकाश डोळस आणि आभार राजशेखर डोळस यांनी मानले.

WhatsAppShare