लॉकडाऊनमध्ये सुद्धा चोरट्यांचा सुळसुळाट

23

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – सायंकाळच्या वेळी रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 55 हजारांचे मिनी गंठण दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता तालेरा कॉर्नर जवळ चिंचवडगाव येथे घडली.

संजना सुनील वर्मा (वय 52, रा. तालेरानगर, चिंचवडगाव) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरासमोरील रोडवर रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 55 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare