लॉकडाऊनमध्ये सुद्धा वॉक करणं पडलं ६०,००० ला; पहा कस ??

61

रहाटणी, दि. ४ (पीसीबी) – सायंकाळच्या वेळी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी मोपेड दुचाकीवरुन जाणाऱ्या तीन चोरट्यांनी जबरदस्ती हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. 3) कोकणे चौक, रहाटणी येथे घडली.

राणी सुभाषचंद्र सखुजा (वय 65, रा. कोकणे चौकाजवळ, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास कोकणे चौक रहाटणी येथील संभाजी गार्डन कॉर्नर जवळून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. त्यातील गाडीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची 60 हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare