वाकड, दि. २३ (पीसीबी) – वाकड येथील जेएसपीएम कॉलेज जवळ पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा ते पावणे सात वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत दशरथ जाधव (वय 37, रा. हडपसर) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी वाकड येथून पुणे-मुंबई सेवा रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांनी त्यांची कार जेएसपीएम कॉलेज जवळ एका हॉटेल समोर थांबवली आणि हॉटेलमध्ये पार्सल जेवण आणण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या कारमध्ये लॅपटॉप होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारची मागील बाजूची काच फोडून 10 हजारांचा लॅपटॉप चोरून नेला.
त्याच दरम्यान डी कॅट लॉनसमोर पार्क केलेल्या भावेश संदेश राऊत (रा. निगडी) यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी 10 हजारांचा मोबाईल फोन आणि पाच हजारांचे डॅश कॅम चोरून नेले. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी 25 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.