लिएन्डर पेस तृणमूल काँग्रेसमध्ये

370

पणजी, दि. २९ (पीसीबी) : टेनिसच्या जगतातील प्रसिद्ध खेळाडू लिएन्डर पेस यांनी आज अधिकृतरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात लिएन्डर पेस यांनी तृणमूलचा झेंडा हातात घेतला.

‘लिएन्डर पेस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगताना आनंद होत आहे’, असं म्हणत यावेळी ममता बॅनर्जी यांनी पेस यांचं पक्षात स्वागत केलं.

‘लिएन्डर पेस माझ्यासाठी छोट्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना तेव्हापासून ओळखते जेव्हा मी युवा मंत्री होते. २०१४ पासून वाट पाहतोय त्या लोकशाहीची सकाळ पाहण्याचं देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करू’, असं म्हणत पेस यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आपुलकी व्यक्त केली.