लालू यादवांना न्यायालयाचा दणका; पॅरोल वाढवण्यास नकार

126

रांची, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तथा माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास झारखंड उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. एवढेच नाही तर ३० ऑगस्टपर्यंत लालूंना जेलमध्ये परतण्यास सांगितले आहे. चारा घोटाळआ केल्याप्रकरणी लालू तुरुंगाची हवा खात आहेत.

कारागृहात असताना अचानक प्रकृती बिघाडल्यामुळे त्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे मागील काही महिन्यापासून ते पॅरोलवर बाहेर आहेत. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या पॅरोलवर कालावधी संपल्यामुळे त्यांनी आणखी तीन महिने पॅरोल वाढवून मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, सदरची विनंती अमान्य करत ३० ऑगस्टपर्यंत त्यांना जेलमध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते.