लालमहालाचे काम लवकरात करण्यात यावे; राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीची मागणी

181

पुणे,दि.९(पीसीबी) – लालमहालाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश यादव व महिलाध्यक्षा संगीता भालेराव यांनी पुणे महापालिकेचे महापौर मुरली मोहोळ व उपमहापौर सरस्वती शेडगे यांना केली आहे.

लाल महालात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते , परंतु लाल महालाचे काम सुरु असलयाने शिवप्रेमींनी लाल महालाचे काम लवकर करण्याची मागणी पत्राद्वारे महापौर यांच्याकडे केली .

यावेळी राकेश सुतार , तानाजीराव शिरोळे , तुषार काकडे , अमर पवार , गणेश नलावडे , राकेश गायकवाड , अश्विनी ढमढेरे , आकाश भालेराव , ज्ञानेश्वर पाटील व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते .

दरम्यान, उपमहापौर सरस्वती शेडगे , नगरसेवक योगेश समेळ , नगरसेवक पृथ्वीराज सुतार , महापालिका अधिकारी ज्ञानेश्वर मोळक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते .

WhatsAppShare