लायन्स क्लब पुणे आकुर्डी यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा

39

अकुर्डी,दि.19 (पीसीबी) : लायन्स क्लब पुणे अकुर्डी यांचा पदग्रहण सोहळा सयाजी हॉटेल वाकड येथे उत्साहात साजरा झाला. या वेळेस प्रांतपाल हेमंत नाईक, माजी प्रांतपाल ओम प्रकाश पेठे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम माने, सचिव अक्षय शहरकर आणि खजिनदार सौ अर्चना कोळी यांचा शपथविधी पार पडला. या वर्षातील डिस्ट्रिक्ट 3234-D2 मध्ये पहिल्या लिओ क्लब चे उद्घाटन प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते जल्लोषात झाले. या बद्दल अध्यक्ष विक्रम माने यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. ला वसंत गुजर यांनी सर्व लिओ ना मार्गदर्शन आणि क्लब उद्घाटन पर भाषण करत लायन पिन बद्दल सुद्धा महत्व सांगितले.

अध्यक्ष पदाची शपथ घेण्यापूर्वी लायन विक्रम माने यांनी आई वडिलांचे आशीर्वाद घेताच संपूर्ण हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या सोहळ्याला जिवाहळयचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच मागील वर्षीच्या अध्यक्ष सचिव आणि खजिनदार यांच्याकडून पदभार नवीन लोकांना देण्यात आला. माजी प्रांतपाल पेठे यांनी पदाचे महत्व आणि करावे लागणारे काम याबद्दल शपथ दिली. या वेळेस हिरामण गवई,राजेंद्र कोळी, विठ्ठल झोडगे,अमृतराव सावंत,वसंत गुजर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच वाकड पोलीस स्टेशन चे प्रमुख डॉ विवेक मुगलिकर यांच्या उपस्थितीमध्ये व्यक्ती शोध पथक प्रमुख श्री संजय कुलकर्णी व माया पवार यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल सत्कार करण्यात आला. रिजन प्रमुख राजश्री शर्मा आणि झोन प्रमुख व्ही के शर्मा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ला राजेश शर्मा यांनी आभार मानले.

WhatsAppShare