लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्षपदी जनार्दन गावडे

86

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्षपदी जनार्दन गावडे यांची निवड झाली. आज (शुक्रवारी) आकुर्डी येथे त्यांचा नुकताच शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला.

सन २०१८-२०१९ च्या निगडी क्लबच्या अध्यक्षपदाची भुरळा गावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी माजी प्रांतपाल राज मुच्छाल, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, विभागीय अध्यक्ष आनंद मुथा, झोनचे चेअर पर्सन प्रशांत कुलकर्णी, हरीदास नायर, दिलीपसिंह मोहिते, सुदाम मोरे, मारूती मुसमाडे, प्रविण जाधव, रामकृष्ण मंत्री, अशोक येवले, चंद्रशेखर पवार, अविनाश चाळके, संजय निंबाळकर आदी उपस्थित होते.