लातूर येथे २९ जुलैला मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक; आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेणार

46

मुंबई, दि. २७ (पीसीबी)  – सकल मराठा समाजाची येत्या २९ जुलैला (रविवार) लातूर येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मराठा समाज मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत गेल्या चार दिवसांपासून मराठा समाजाने सुरु केलेल्या ठोक आंदोलनाचा राज्यभरात वनवा पेटला आहे. त्यामुळे २९ जुलैला मराठा समाज काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.