लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल सोमवारी

59

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषदेचा निकाल सोमवारी (दि.११) ला लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे (दि.२४ मे) पासून   लातूर-बीड-उस्मानाबाद  विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली होती. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी लागणार असल्याचे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितले.

या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात काट्याची टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसेंदिवस निकाल पुढे ढकलत चालल्याने लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत एकुण १ हजार ६ मतदार होते.