लातूरमध्ये मराठा आंदोलकांकडून आमदाराला धक्काबुक्की; कारही फोडली

280

लातूर, दि. ९ (पीसीबी) –  मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनालादरम्यान लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की झाली आहे. तसेच भिसे यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेकही केली. रेनापूर फाटा याठिकाणी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भिसे मतदारसंघातील अनेक गावात फिरत होते. यावेळी भिसे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तुम्ही समाजासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला. आंदोलकांनी भिसे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. काही लोकांनी आमदार भिसे यांना या गोंधळातून बाहेर काढले. दरम्यान काही आंदोलकांना त्यांना धक्काबुक्कीही केली.