“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही. सगळंच रामभरोसे आहे”; मनसेची मोदी- ठाकरेंवर सडकून टीका

24

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : देशात कोरोनानारे थैमान घातलं असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर थैमान दुसऱ्या लाटेनं घातलं असून, देशात रुग्ण सारख्या वाढत आहे. बेड, ऑक्सिजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्यांचे कडक निर्बंधांमुळे हाल होऊ लागले आहेत. याच अवघड परिस्थितीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हंटल आहे कि, “लसीकरण आहे, पण लस नाही. खाटा आहेत, पण ऑक्सिजन नाही. उपचार आहेत, पण औषध नाही. व्यापारी आहेत, पण व्यापार नाही. लोक आहेत, पण नोकरी नाही. मन की बात आहे, पण मनातलं नाही. मुख्यमंत्री आहेत, पण रस्त्यावर नाहीत. सगळंच रामभरोसे आहे, पण त्यात काहीच राम नाही.”

WhatsAppShare