लग्न समारंभासाठी गावी गेले आणि तेवढ्यात चोरट्यांनी साधला डाव

72

चिंचवड, दि. 25 (पीसीबी) : लग्न समारंभासाठी मूळ गावी गेलेल्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. तसेच त्यांच्या शेजारील घरातही चोरी केल्याचे उघडकीस आले. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी आठ वाजताच्या सुमारास केशवनगर चिंचवड येथे उघडकीस आली. राज सुदाम भालेराव (वय 23, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील मुळगावी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. 21 जुलै रोजी सकाळी सहा ते 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या कालावधीत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून चार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजारांची चांदीचे पैंजण असा एकूण साडेसहा हजारांचा ऐवज चोरून नेला.

तसेच फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे शांती वर्मा यांच्या घराचे देखील अज्ञात चोरट्यांनी कोयंडा आणि कुलूप तोडून चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare