लग्नात 125 तोळे सोने त्यानंतर 83 लाख रुपये घेऊनही पैशांसाठी विवाहितेचा छळ; विवाहितेची आत्महत्या

65

मोशी, दि. ८ (पीसीबी) – सासरच्या लोकांनी मागणी केल्याप्रमाणे लग्नात 125 तोळे सोने देण्यात आले. त्यानंतर व्यवसायासाठी म्हणून आणखी 83 लाख रुपये देण्यात आले. एवढे पैसे देऊनही सासरच्या लोकांनी पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली.

पती अखिल विपीन (वय 33), सासू सुधा विपीन (वय 53, दोघे रा. मोशी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी (वय 64) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 25 जानेवारी 2015 ते 7 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मागणीनुसार फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात 125 तोळे सोने दिले. परंतु लग्नात पैसे दिले नव्हते. आरोपींना व्यवसाय करण्यासाठी म्हणून नंतर 83 रुपये रोख स्वरूपात फिर्यादी यांनी दिले. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार पैशांच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने गुरुवारी (दि. 7) राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पती अखिल याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील तपास करीत आहेत.

WhatsAppShare