लग्नाच्या शूटींगसाठी विकी-कतरिनाला मिळणार १०० कोटी रुपये ?

122

नवी दिल्ली,दि.०७(पीसीबी) – अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टवर ९ डिसेंबर रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दोघांचेही कुटुंबीय राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. ८ डिसेंबर रोजी मेहेंदीचा कार्यक्रम असणार आहे. दरम्यान, विकी आणि कतरिनाला त्यांच्या लग्नातील व्हिडीओ आणि फोटोंसाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मने १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याते म्हटले जात आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिमेकडे अनेक वेळा अतिशय लोकप्रिय व्यक्तींच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ अनेक चॅनेल, मासिकांमध्ये दिसतात. तसेच अनेक चाहत्यांना आपल्या आवडल्या कलाकारांच्या आयुष्यातील आनंदाचे आणि काही खास क्षण पाहण्याची देखील इच्छा असते. हाच ट्रेंड आता भारतात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एका ओटीटी प्लॅटफॉर्मने फूटेजसाठी विकी आणि कतरिनाला १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

जर कतरिना आणि विकीने ही ऑफर मान्य केली तर त्यांच्या लग्नाचे फूटेज एडिट करुन ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या स्वरुपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कतरिना आणि विकी याबाबत निर्णय घेणार आहेत. पण त्यांनी काय निर्णय घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर दुसरीकडे कतरिना आणि विकीने लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो काढण्यावर बंदी घातली आहे. त्यांनी कार्यक्रमांमध्ये फोन वापरण्यावर देखील बंदी घातल्याचे म्हटले जात आहे.