लग्नाचे वचन देऊन न्यायाधीशाने केला महिला वकिलावर बलात्कार

1511

सूर्यापेट, दि. १६ (पीसीबी) – लग्नाचे वचन देऊन तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यात एका कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशाने महिला वकिलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पिडीत २९ वर्षीय महिला वकिलाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश  सत्यनारायण राव ( वय २८)  यांना बलात्काराच्या आरोपाखाली  अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण हे तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातील एका कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यांनी २९ वर्षीय पिडीत महिेलेला लग्नाचे वचन देऊन तिच्या बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेची फसवणूक करुन दुसऱ्या महिलेशी साखरपुडा केला. याप्रकरणी पिडीत महिलेने ३ ऑगस्टला पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायाधीश  सत्यनारायण राव यांना अटक करण्यात आली आहे.