लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

519
संग्रहित
निगडी, दि.२९ (पीसीबी) – १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बर्ड व्हॅली गार्डन संभाजीनगर, पुणे येथे फिरायला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात निगडी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक नाही.
व्यंकटेश जगदाळे (रा. विद्यानगर,चिंचवड, पुणे) असे या आरोपीच नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने याने गेल्या सात ते आठ महिन्यापासून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढावून बर्ड व्हॅली गार्डन संभाजीनगर, चिंचवड येथे फिरायला घेऊन जात फिर्यादीच्या मुलीसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. मुलगी ५ महिन्याची गरोदर आहे असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अधिकारी आरदवाड करीत आहेत.   
WhatsAppShare