लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

238

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ही घटना मे २०२० ते ५ जून २०२२ या कालावधीत खडकी येथे घडली.

गौरव काकासाहेब साबळे (वय २५, रा. खडकी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी सोबत मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने त्याच्या घरी बोलावून वेळोवेळी फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.