लंडनमध्ये समोर आला करोना विषाणूचा नवीन प्रकार; शास्त्रज्ञांसमोरील आव्हानांमध्ये वाढ

182

लंडन, दि. २७ (पीसीबी) : करोना महासाथीच्या आजाराचे अजूनही थैमान सुरू आहे. महासाथीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे करोना विषाणूचा नवीन प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.

करोनाच्या ए. वाय. ४.२ या नव्या विषाणूचे रुग्ण भारतात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा विषाणूचा प्रकार काय आहे? या विषाणूचे रुग्ण आधीच्या ‘म्युटंट’पेक्षा यात काय वेगळे आहे –

करोनाच्या ए. वाय. ४.२ या प्रकारचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ब्रिटनमध्ये जास्त आहे. करोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

चीनमध्ये पुन्हा करोना उद्रेक?; बाधितांची संख्या वाढण्याची भीती
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ‘डेल्टा’ प्रकारांची सबलाइनर प्रकरणे आढळून आल्यानंतर भारताचा करोना ‘जीनोमिक सर्व्हिलन्स प्रोजेक्ट’ ‘हाय अलर्ट’वर आहे. नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अर्थात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात इंदूरमध्ये नवीन कोव्हिड प्रकारच्या ए. वाय. ४.२ डेल्टा व्हेरिएंटची सात प्रकरणे आढळून आली आहेत.

‘ए. वाय. ४.२’चे प्रमाण सर्व प्रकरणांमध्ये सुमारे सहा टक्के आहे. ए. वाय. ४.२ नावाचा डेल्टा व्हेरिएंट हा ब्रिटनमध्ये पसरल्याचे ‘नॅशनल सेंटर फॉर डीसिज