रोहित पवारांनी पैसे वाटून निवडणूक जिंकली रोहित पवारांची आमदारकी रद्द करा – राम शिंदे

118

जामखेड, दि.१२ (पीसीबी) – मंत्री आणि भाजपचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवारांच्या प्रचारावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली आहे. आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे.

माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवारांनी मतदारांना लाच देणे, प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपवणे आणि या सर्वांचा आधार घेऊन निवडणुकीत विजय मिळवला, असे आरोप राम शिंदे यांनी केले. राम शिंदे यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेत पुढील गोष्टी नमूद केल्या आहेत. “मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांमध्ये पैशांचे वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी”