रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने गुरूवारी भोसरीत “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” महानाट्याचे आयोजन

12

भोसरी दि. ५ (पीसीबी) – रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी (दि. ७) “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” या प्रसिद्ध महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार निर्माण परिषदेच्या वतीने विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. बेरोजगार युवकांना रोजगार व आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजाला योग्य दिशा मिळावी यासाठी यावर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार अनिरुद्ध वनकर प्रस्तुत “दि ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. त्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोजगार निर्माण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव मदने यांनी केले आहे.