रेशन दुकानातून धान्य तात्काळ उपलब्ध करून द्या – चंद्रकांत पाटील

129

 

पुणे, दि.२ (पीसीबी) – कोथरूड मतदारसंघातील ४९ रेशन दुकानांमध्ये जी रेशन कार्ड प्रमाणित आहेत. ज्या रेशनकार्डवर नियमित धान्य पुरवठा होतो, अशा सर्वांना अन्न सुरक्षा आणि अंत्योदयअंतर्गत धान्यपुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार सोनावणे यांच्याकडे केली.

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रेशन दुकानातून धान्य तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. पाटील यांनी आज कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे तहसीलदार आणि अन्न धान्य पुरवठा अधिकारी सोनावणे आणि अन्न पुरवठा अधिकारी गायकवाड यांच्याशी मतदारसंघातील ४९ रेशन दुकानांमधून धान्य सुरळीत मिळण्यासंदर्भात चर्चा सविस्तर चर्चा केली.

काही रेशनकार्डधारकांनी अद्याप धान्य घेतले नसल्याने जी रेशनकार्ड बंद आहेत, त्यांची यादी तयार करण्याची सूचना श्री. पाटील यांनी केली. यासर्व कार्डधारकांसाठी उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल रोजी बैठक घेऊन सविस्तर चर्चेद्वारे मार्ग काढण्यात येणार आहे.

WhatsAppShare