रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलेवर पिस्तूल रोखत मागितले हजारो रुपये..

86

तळेगाव दाभाडे, दि. १२ (पीसीबी) – पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलेच्या घरात घुसून महिलेवर पिस्तूल रोखत 15 ते 20 हजार रुपयांची मागणी केली. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री साडेआठ वाजता मामुर्डी येथे घडली.देवा जमादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री घरी असताना आरोपी देवा जमादार अनाधिकाराने त्यांच्या घरात आला. त्याने महिलेकडे 15 ते 20 हजार रुपये देण्याची मागणी केली. पैसे देण्यास महिलेने नकार दिला असता देवा याने महिलेवर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक विकास गोवले तपास करीत आहेत.

या देवा जमादार याने त्यानंतर गहुंजे येथील एका दुकानात जाऊन दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. त्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे