रुपीनगर येथील कंपनीत पावणेदोन लाखांची चोरी…

98

रुपीनगर, दि. १७ (पीसीबी) – रुपीनगर येथील डॉयस सी टूल्स अँड कंपोनंटस या कंपनीचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 8 जानेवारी रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.

स्टीफसन्स आमोस डॅनियल (वय 60 रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी रविवारी (दि. 16) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॅनियल यांची रुपीनगर तळवडे येथे डॉयास-सी टूल्स अँड कंपोनंनटस नावाची कंपनी आहे. ही कंपनी कुलूप लावून बंद असताना 8 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कंपनीमधील पितळी कॉइलचे पाच बंडल, तांब्याच्या धातूचे स्क्रॅप मटेरियल असा एकूण एक लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस हवलदार सी डी सावंत तपास करीत आहेत.