रुद्रा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील भोसले यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश

183

मोशी,दि.०९(पीसीबी) – रुद्रा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. स्वप्निल भोसले हे त्यांच्या रूद्रा युवा प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रम राबवितात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वप्निल भोसले यांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणांना वेगळेच वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वप्निल भोसले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह समवेत केवळ राजकारण नाही तर समाजकारण करण्याच्या उद्देशाने मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी अनिल शिदोरे सरचिटणीस/नेते-म.न.से, राजेंद्र वागसकर म.न.से. नेते, ॲड. गणेशआप्पा सातपुते उपाध्यक्ष-म.न.से, रणजितदादा शिरोळे उपाध्यक्ष-म.न.से, किशोरभाऊ शिंदे सरचिटणीस-म.न.से, सचिन तुकाराम चिखले गटनेते, नगरसेवक, शहराध्यक्ष, पिं.चिं.मनसे.

WhatsAppShare