रुग्णालयात १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती

376

अॅरिझोना, दि. २२ (पीसीबी) – एखाद्या मोठ्या रुग्णालयात एका वेळी १६ बाळंतपण कदाचित होत नसतील, पण एक असे रुग्णालयही आहे जिथल्या १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती आहेत. या सर्वजणी रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) विभागातल्या परिचारिका आहेत.

या १६ जणींनाही ही गोष्ट आधी माहित नव्हती. त्यांनी एक फेसबुक ग्रुप बनवल्यानंतर त्यांना कळले ही त्या एकूण १६ जणी आहेत ज्या गरोदर आहेत. त्या सर्वांची प्रसूती ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात होणार आहे.

बॅनर डेझर्स मेडिकल सेंटरमध्ये या सर्व नर्सेस काम करतात. त्यापैकी एक रॉशेल शेरमन म्हणते, ‘फेसबुक ग्रुप तयार होण्यापूर्वी आम्हाला हे ठाऊक नव्हते की आमच्यापैकी किती जणी गर्भवती आहेत.’