रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट

80

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – रिलायंस उद्योग समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले आहे. या प्रकऱणी अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.