रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; कर्जाचा हप्ता वाढणार

252

नवी दिल्ली, दि.६ (पीसीबी) – रिझर्व्ह बँकेने व्याज दरात वाढ करून महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो रेटच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांना बँकेतून कर्ज घेणे सुद्धा महागात पडणार आहे.

आरबीआयने वार्षिक पतधोरण जाहीर केले आहे. रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के इतका झाला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ४ वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जाच्या हप्तांवर  व्याज वाढणार आहे.

बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, त्यावर रिझर्व्ह बँक जो व्याजदर आकारते, त्याला रेपो रेट म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर बँकांना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावे लागते. तर त्याउलट रेपो रेट वाढला तर बँकांना आरबीआयला जास्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करून फायदा मिळवून देता. मात्र, जर तोटा झाला तर तोही ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. म्हणजेच वाढलेल्या रेपो दराचा सर्वसामान्य कर्जदारालाच फटका बसतो.