रिक्षा विजेच्या खांबाला धडकल्याने चालकाचा मृत्यू

59

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – विजेच्या खांबाला धडकून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या  रिक्षा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.९) रात्री अकराच्या सुमारास  डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावर झाला.

सतीश गोविंद पंडागळे (वय ५७) असे मृत्यु झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पंडागळे हे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आपल्या ताब्यातील रिक्षा (एम.एच.१२/एफ.सी.१३३८) घेऊन डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने घरी जात होते. यावेळी रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा जोरात जावून आदळली. यामध्ये चालक पंडागळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.  त्यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे तीनच्या सुमारास  मृत्यू झाला.