‘रिक्षा चालकांना न्याय द्या. ओला, उबेर हद्दपार करा’; शहर रिक्षा चालकांचे ‘या’ आमदारांकडे साकडे

1

तळेगाव दाभाडे, दि.१३ (पीसीबी) : आमदार सुनील शेळके यांना तळेगाव दाभाडे शहर रिक्षा संघाकडून तळेगाव दाभाडे येथील स्थानिक रिक्षाचालकांवर ओला, उबेर रिक्षा आणि टॅक्सी यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. इतके वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांना न्याय मिळावा अन ओला, उबेर तळेगाव नगर परिषद हद्दीतून हद्दपार करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे दिलीप डोळस, हेमंत वैरागी, दिलीप शेळके, सुशांत ननावरे, शंकर जंगम स्वामी, विजय गुंडगिरी, सुनील आवटे, प्रशांत शिंदे, सोमनाथ जावळेकर, राकेश टकले, बाळु निबांळकर गोरख म्हसे, किसन कुडाळकर यांच्या सह शेकडो रिक्षा चालक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे कि, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा व्यवसाय बंद होता, सध्या रेल्वे सेवा बंद असून जो थोडाफार धंदा होतो, तो ओला उबेरमुळे होत नाही. यामुळे तळेगाव दाभाडे येथील रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत रिक्षाचे हप्ते भरणेही अवघड झाले आहे. तसेच शहरा बाहेरील प्रवासी ओला, उबेर वाहतुकीमुळे स्थानिक रिक्षाचा वापर करत नाही त्यामुळे रिक्षा चालकांना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. असे तळेगावकर रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

WhatsAppShare