राहुल गांधी १२ जून रोजी मुंबई दौऱ्यावर

52

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी भिवंडी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यासंदर्भात मुंबईत येणार आहेत. भिवंडी न्यायालयात हजेरी लावल्यानंतर   राहुल गांधी यांची गोरेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत ते बूथ लेव्हलच्या पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. ज्यानंतर संघ कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावरिोधात मानहीचा खटला दाखल केला आहे.

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी आधीच टीका केली आहे. बुधवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर गोरेगाव या ठिकाणी राहुल गांधी नेमके काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.