राहुल गांधी कैलास मानसरोवरच्या यात्रेवर जाणार

101

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – येत्या ३१ ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कैलास मानसरोवरच्या यात्रेवर जाणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणार असल्याचे जाहीर केले होते. सध्या ते दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर असून पूरग्रस्तांची विचारपूस करत आहेत.

राहुल गांधी हे नेपाळ ऐवजी चीनमार्गे कैलास मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचे सांगण्यात येते. कर्नाटक निवडणूक प्रचारावेळी राहुल गांधी प्रवास करत असलेले विमान अचानक ८ हजार फुट खाली आले होते. त्यावेळी आपल्याला भगवान शंकराची आठवण झाली होती, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी त्यांनी कैलास मानसरोवरची यात्रा करण्याचे निश्चित केले होते.

गुजरात निवडणुकीवेळी त्यांनी आपण जनेऊ धारी (जानवे धारक) ब्राह्मण असून भगवान शंकराचे भक्त असल्याचे म्हटले होते.