राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये – उध्दव ठाकरे

165

सांगली, दि. १२ (पीसीबी) – वीर सावरकर यांना भित्रा म्हणणारा राहुल गांधीसारखा नालायक माणूस संसदेत पोचता कामा नये, असे शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर  निशाणा साधला आहे. तसेच खासदार  राजू शेट्टी यांना मागील वेळेस  पाठिंबा दिला ही माझी चूक होती, असेही ठाकरे यावेळी  म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे  उमेदवार उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपूरमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत  उध्दव ठाकरे  बोलत होते.

ठाकरे म्हणाले की, सावरकर यांना  समजून  घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचा, असा  सल्लाही ठाकरे यांनी राहुल गांधींना दिला.  मराठी समजत नसेल, तर इटलीच्या भाषेत लिहून घेऊन भाषण करण्याचा सल्ला देत ही इटली नाही भारत आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. वीर सावरकरांनी देशासाठी  कष्ट भोगले आहे. तसे कष्ट जर नेहरूंनी भोगले असते,  तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.