राहुल गांधींनी डोळाच मारलाय; सभागृहात काय काय मारलय, हे देशाला माहीत – कुमार विश्वास

148

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतलेल्या गळभेटीमुळे राहुल गांधी यांची सोशल मीडियातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तर आम आदमी पक्षाचे खासदार कुमार विश्वास यांनी राहुल गांधी यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. डोळाच तर मारलाय नाहीतर या सभागृहात कायकाय मारण्यात आले आहे, हे देशाला माहिती आहे,  असे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे.

अविश्वास प्रस्तावावरील  भाषणात राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमक शैलीत राफेल करार, महिला अत्याचार, जमावाकडून होणारी मारहाण आणि हत्या आदी  मुद्द्यांवर मोदी सरकारवर हल्ला चढवला. त्यानंतर राहुल यांनी अनपेक्षितपणे जाऊन पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली.

या गळाभेटीनंतर राहुल गांधी यांनी मोठ्या मिश्किलपणे हसत ज्या प्रकारे बाजूला बसलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहून डोळा मारला. या प्रकाराची सध्या सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. काहींकडून राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे.  तर काहींनी त्यांच्या कृतीचे समर्थन केले आहे. सोशल मीडियाप्रमाणेच राजकीय क्षेत्रातही याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत.