राहुल गांधींनी घेतले अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन

219

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतून निवासस्थानातून भाजपा मुख्यालयात नेण्यात येणार असून तिथे सर्वसामान्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. अंत्ययात्रेत सुमारे ५ लाख लोक येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळी त्याचे निधन झाले.