राहुल गांधींना मनोरूग्णालयात दाखल करण्याची गरज; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान  

107

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वेड लागले आहे. त्यांना मनोरूग्णालयात पाठवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान  केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी केले आहे. राहुल यांना स्क्रिझोफेनिया झाला आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे आकाशाएवढे उत्तुंग असून त्यांच्यापुढे राहुल गांधी  नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत, असेही चौबे यांनी म्हटले आहे.

देशाच्या पंतप्रधानाबाबत राहुल गांधी यांनी अपशब्द वापरले आहेत. राहुल गांधी हे एखाद्या नाल्यातील किड्याप्रमाणे आहेत, ते स्वतःच भारत काँग्रेस मुक्त करतील, असे अश्विनी चौबे यांनी म्हटले आहे. मोदी यांना राहुल गांधी खोटारडे म्हणतात. मात्र राहुल गांधी स्वतःच देशात खोट्या गोष्टी पसरवत आहेत. दुसऱ्यांना वेडे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांनी स्वतःकडे पाहिले पाहिजे.

राफेल कराराबाबत  राहुल गांधी  खोटा प्रचार करत आहेत.  मोदींवर आरोपांची चिखलफेक करत आहेत. मात्र त्यांच्या या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते मनोरूग्ण झाले आहेत त्यामुळे त्यांना मनोरूग्णालयात दाखल केले जावे अशीही मागणी चौबे यांनी केली आहे.