राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होता, तर फडणवीसांनी आधीच केंद्राकडे का नाही पाठवला – प्रकाश आंबेडकर

0
654

मुंबई,दि.२५(पीसीबी) – एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवले आहे. यावर राज्यातील नेत्यांकडून संशय वक्त केला जात असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

“एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवले नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.एल्गार परिषदेसंदर्भात केंद्रानं घेतलेल्या निर्णयावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आबेडकर यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.

“शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच मी स्वागत करतो. हे प्रकरण केंद्रानं एनआयएकडे दिला आहे. हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून अविश्वासच आहे. त्यामुळे शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला नाही, तर केंद्र सरकार मनमानी करेल,” असं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर म्हणाले आहेत.