राष्ट्रीय रोलर स्केटिंग, कुडो स्पर्धेत एस.बी. पाटील पब्लिक स्कूलचे यश

84

पिंपरी, दि.२० (पीसीबी) –  विशाखापट्टणम येथे झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय रोलर स्केटींग व कुडो स्पर्धेत एस.बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

यामध्ये गौरव शर्मा (इ.९ वी) याने रोलर स्केटींग प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला तर राष्ट्रीय कुडो स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात ३० किलो वजन उचलून आयुषी कुशवाह (इ.८वी) हिने व्दितीय क्रमांक मिळविला. मुख्याध्यापिका बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्‌मावती बंडा, प्रशिक्षक धनाजी पाटील, शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यशस्वी विद्यार्थ्यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, मुख्याध्यपिका बिंदू सैनी यांनी अभिनंदन केले.